Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट; ‘त्या’ कॉलने वाढवला सस्पेन्स

3309 0

पुणे : दर्शना पवार प्रकरण (Darshana Pawar Murder Case) सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि वन विभागात रुजू झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (Darshana Pawar Murder Case) आढळल्याने पुणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह सापडला होता.

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मृत्यूचे गूढ उकलंल; खून झालेल्या दिवशीचा घटनाक्रम आला समोर

काय घडले होते नेमके?
दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कारासाठी ती 9 जून रोजी पुण्यात आली होती. नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी सिंहगडावर जायचे आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हंडोरे हा मित्र होता. 12 जूनला तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधला असता तिचा संपर्क होऊ शकला नाही. यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला मात्र कुठेच पत्ता लागला नाही. अखेर शेवटी तिच्या पालकांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलिसांत दिली.

Hardeep Singh Nijjar : कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या

तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या कुटुंबीयांनीही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली. दर्शना आणि तिचा मित्र राहुल 12 जून रोजी दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. यानंतर दोघांनी गड चढायला सुरुवात केली. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही तो खाली आल्याचे दिसून आले. या घटनेनंतर राहुल हंडोरे फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट
या प्रकरणात पोलिसांचा संशय दर्शनाचा मित्र राहुलवर आहे. मात्र तो देखील बेपत्ता आहे. त्याच्या मोबाइलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन या प्रकरणात मी काहीही केलं नसल्याचे घरच्यांना सांगितले. दर्शनाचा मृत्यू डोक्यावर आणि शरीरावर जखमा झाल्याने झाला असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. नव्या करिअरची सुरुवात करण्यापूर्वीच दर्शनाच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार

Posted by - May 20, 2022 0
वाराणसी- ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आला आहे. आता जिल्हा न्यायाधीश…

लता मंगेशकर यांचं निधन ; केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली काव्यमय श्रद्धांजली

Posted by - February 6, 2022 0
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला लता मंगेशकर यांच्या निधनाने…

धक्कादायक! नांदेडमध्ये 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू

Posted by - October 2, 2023 0
हाफकिन’ने औषधी खरेदीचा गोंधळ घातल्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांनाही वेळेत औषधी न मिळाल्याने परिणामी…

नितीन गडकरींपाठोपाठ आता रावसाहेब दानवे शिवतीर्थावर ; राज ठाकरेंची घेतली भेट

Posted by - April 9, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लवकरच मी भेट घेणार आहे, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत काही दिवसांपुर्वी…

Lok Sabha Elections : ठाकरे गटाचे स्टार प्रचारकरांची यादी जाहीर; 40 जणांचा समावेश

Posted by - March 30, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *