नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एसटी बस-ट्रकमध्ये भीषण अपघात (Accident) झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, ट्रकचा चालक जागीचं ठार झाला आहे. तर एसटीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील जखमींना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात (Accident) नाशिकमधील पेठ-गुजरात महामार्गावरील रामशेज किल्ल्याजवळ झाला आहे.
Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू
काय आहे नेमके प्रकरण?
नाशिकमधील पेठ-गुजरात महामार्गावर रामशेज किल्ल्याजवळ एसटी सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. एसटी पुण्याकडे निघाली होती. या अपघातानंतर जोराचा आवाज झाल्यामुळे लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात ट्रक चालक जागीचं ठार झाला तर अपघातामध्ये बसमधील 12 प्रवासी जखमी झाला. नाशिक जिल्हा सिव्हिल रुग्णालयात या सगळ्या प्रवाशांवर उपचार सुरु आहेत.
Accident : हिंगोलीत भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू
एसटीच्या चालकाची प्रकृती गंभीर
पोलिसांनी अपघात झाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. या अपघात प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही चालकांना गंभीर मार लागला होता. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला होता.