आतापर्यंत प्रेयसी, बहिण, बायको, मैत्रीण, सहकारी अशा अनेक महिलांना पुरुषांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागले आहे. मात्र आता राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुलाने आपल्या सख्ख्या आईवर अत्याचार केलेत.
ही घटना आई व मुलगा मामाच्या घरून परतत असताना घडली. या प्रकरणी आरोपी मुलावर गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला दोन मुले व एक मुलगी आहे. मोठ्या मुलासह ही महिला आपल्या भावाच्या घरी गेली होती. रात्रीच्या वेळी आपल्या घरी दुचाकी वरून परतत असताना मुलाने मद्य प्राशन केले होते. असलेल्या मुलाने आईला निर्जन स्थळी नेले. व त्याच्यावर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आईने ‘बेटा मी तुझी आई आहे, माझ्याबरोबर असं करू नको’, अशी विनवणी केली. पण दारूच्या नशेत असलेल्या राक्षसाला आईची दया आली नाही. आणि त्याने आईवर बलात्कार केला.
त्यानंतर पीडित आई ही घरी पोहोचली. व रडत रडत सर्व प्रकार मुलांना सांगितला. त्यानंतर या मुलांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. डाबी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.