काही दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचे पुत्र वनराज आंदेकर यांचा खून झाला. वनराज यांची सख्खी बहिण संजीवनी कोमकर आणि तिचा पती जयंत कोमकर यांच्यात सांगण्यावरून गुंड सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वनराज यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला मात्र या प्रकरणानंतर सोमनाथ गायकवाड हे नाव प्रचंड चर्चेत आले आहे. सोमनाथचं समर्थन करणाऱ्या अनेक रिल्स व्हायरल होतायत. हाच सोमनाथ उर्फ सोम्या गायकवाड नेमका आहे तरी कोण ? पहा टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये…
आंबेगाव पठार परिसरात गुंड सोमनाथ गायकवाड याचं मोठं नाव आहे. सोमनाथ गायकवाड हा पूर्वीचा आंदेकर टोळीचा सदस्य आणि गुंड बंडू आंदेकर यांचा विश्वासू साथीदार होता. बंडू आंदेकर यांनी सोमनाथ गायकवाडला एक क्लब देखील टाकून दिला. मात्र बंडू आंदेकर यांचं वय झाल्यामुळे टोळीचे सूत्र आपल्याकडे यावीत किंवा पुण्यातील गुन्हेगारीत वर्चस्व गाजवण्यासाठी सोमनाथ गायकवाड हा आंदेकर टोळी पासून वेगळा झाला. आणि स्वतःची टोळी सुरू केली. त्याच्या याच टोळीतील निखिल आखाडे नावाच्या गुंडाचा वर्षभरापूर्वी आंदेकरांच्या घराजवळ खून झाला. या खुनामागे आंदेकर टोळीचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड अनेक दिवसांपासून आंदेकर टोळीच्या शोधात होता. वनराज ला संपवण्याचा प्लॅन अनेक दिवसांपासून तो करत होता. त्यातच संजीवनीचा दीर प्रकाश कोमकर याचा वनराज ला संपवण्यासाठी फोन आला आणि गायकवाडला आयती संधी चालून आली. या संधीचा फायदा घेत त्याने सोमनाथ वर हल्ला केला आणि अखेर वनराजला संपवलं.
गुन्हेगारीत नव्या आलेल्या गुंडांकडून टोळीच्या म्होरक्याला किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीला संपवण्याचा पॅटर्न अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. तसाच काहीसा प्रकार या प्रकरणात देखील झालाय, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मात्र सोमनाथला बदला घ्यायचाच होता तर मला किंवा माझा लहान मुलगा कृष्णराजला मारायचं होतं. वनराजचा गुन्हेगारीशी काहीच संबंध नसताना त्याला का मारलं हा एकच प्रश्न वडील बंडू आंदेकर यांच्याकडून विचारला जातोय. तर या प्रकरणामुळे पुण्यात सोमनाथ गायकवाड या गुंडाची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात होतेय, हे नक्की….