राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महायुती ही सज्ज झाली असून महायुतीतील तीनही घटक पक्ष रणनीती आखत असल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसमान यात्रा सुरू असून आता याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाचा वादा हे कॅम्पेनिंग राबवत असून या पार्श्वभूमीवर या अगोदर काम करत आलोय काम करत राहणार हे गाणं प्रदर्शित झालं होतं त्यानंतर आता बदललाय काळ आता वेळ बघा आता जिंकायचं असं या गाण्यांमध्ये म्हटलं आहे