Crime

धक्कादायक ! पुण्यात होम ट्युशनसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यानं मोबाइलद्वारे काढला व्हिडिओ ; गुन्हा दाखल

529 0

होम ट्युशनसाठी शिकवायला येणाऱ्या शिक्षिकेचा एका विद्यार्थ्यानं आपल्या मोबाइलद्वारे व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.

16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यानं आपल्या घरातील वॉशरूममध्ये मोबाइल ठेवून दिला आणि शिक्षिका वॉशरूममध्ये गेल्यानंतर तिचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. शिक्षिकेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यानं आपल्य वॉशरूममध्ये मोबाइल लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. विद्यार्थ्याला शिकवत असतानाही त्यानं आपला व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केल्याचं पीडित शिक्षिकेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide