CRIME NEWS : धक्कादायक ; आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलानेचं घेतला बापाचा जीव

375 0

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत गावामध्ये शिवाजी थोरात यांने आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने पाठीवर वार केला होता.

आईला कुर्‍हाडीने मारुन जखमी केले म्हणून मयत शिवाजी थोरात यांचा मुलगा तानाजीने वडिलांना झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली. त्याचबरोबर बहिणीला कुर्‍हाडीने मारल्याचा राग मनात धरुन मयताचा मेव्हुणा भीमराव जाधवने ही मेवण्यास शिवीगाळ करत लाकडी काठीने दोन्ही हात,पाय,मांडी आणि छातीवर मारहाण करून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींवर आयपीसी कलम 302,177, 342, 504, 34 प्रमाणे मंद्रूप पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!