Sharad Mohol Murder

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

675 0

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Sharad Mohol) पोलिसांनी आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्यांसह पिस्तुल आणि पैसे पुरवणाऱ्यांना आतापर्यंत अटक केली.त्यांच्या चौकशीतून रोज धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. हत्या झाल्यानंतर आरोपींनी एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला फोन करून शरद मोहोळची गेम केलीय, मास्टरमाईंडला सांगा असा कॉल केला.

पोलिसांनी नितीन अनंता खैरे,आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केलीय. यातील संतोष कुरपे हे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट म्हणून काम करत आहेत. संतोष कुरपे यांनाच हल्लेखोरांनी हत्येनंतर पहिला फोन केला होता. आरोपींनी हत्या केल्यानंतर त्यांनी एक नवं सिम कार्ड घेतलं होतं. आधीचं सिमकार्ड काढून फेकलं आणि नवं सिमकार्ड मोबाईलमध्ये घातलं. त्यावरून पहिला फोन कॉल संतोष कुरपे याला करण्यात आला होता. शरद मोहोळची गेम केलीय आहे, ही गोष्ट मास्टरमाईंडला सांगा असं फोनवरून सांगण्यात आलं. त्यामुळे आता हा मास्टरमाईंड कोण असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

काय घडले होते नेमके?
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का ! माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं

Pandharpur News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद

Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग

Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!