नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जवळ आल्याने सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. राजकीय वर्तुळात बैठकांचं सत्र सुरू झालंय. अशातच आता विरोधी पक्षांच्या हालचालींना देखील वेग आलाय. विरोधकांच्या आज पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यांच्या अगोदर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांना आघाडीच्या समन्वयकपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारल्याने मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
इंडिया आघाडीच्या व्हर्चुअल बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर एकमत झालं, त्यामुळे आता काँग्रेसला येत्या लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. आत्तापर्यंत आघाडीच्या 4 बैठका झाल्या होत्या. पाटणा, बंगळूर, मुंबई आणि दिल्ली अशा चार बैठका होऊनही समन्वयक नियुक्ती झाली नव्हती.
विरोधकांच्या ऑनलाईन बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, नितीश कुमार, एमके स्टॅलिन, शरद पवार, डी राजा,ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी, सीताराम येच्युरी, लालू यादव-तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, डी राजा हे नेते उपस्थित होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु
IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी
Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू
Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन