मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस असतानाच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. यावर आता काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी गंभीर आरोप केला आहे. मिलिंद यांच्या पक्ष सोडण्याच्या घोषणेचा वेळ पंतप्रधान मोदींनी ठरवला होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाले जयराम रमेश ?
जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, शुक्रवारीच माझे देवरांसोबत फोनवर बोलणे झाले. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, मुंबई दक्षिण मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा सांगितला आहे. याबाबत राहुल गांधी यांच्यासोबत सविस्तर बोलणं करायचं आहे. त्यांनी मला शुक्रवारी सकाळी 8.52 रोजी मेसेज केला होता आणि दुपारी 2.47 वाजता मी त्याच्यावर त्यांना रिप्लाय दिला. तुम्हाला पक्षांतर करायचंय का, असा प्रश्नही मी देवरा यांना केला होता. त्यावर त्यांनी 2.48 वाजता मला एक मेसेज केला की मला तुमच्याशी बोलायचं आहे, हे शक्य होईल का? त्यावर मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला फोन करेन. त्यानुसार मी 3.40 वाजता त्यांच्याशी फोनवर चर्चा केली.
फोनवर देवरा यांनी म्हटलं की दक्षिण लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेचा उमेदवार आहे. पण मला राहुल गांधी यांना भेटायचे आहे आणि मतदारसंघाबाबत चर्चा करायची आहे. तसंच, याबाबतीत मीदेखील त्यांच्याशी चर्चा करावी, अशी देवरा यांची इच्छा होती. जयराम रमेश यांनी आरोप केला आहे की, मिलिंद देवरा यांना पक्ष सोडायचा होता. राजीनामा देण्याची घोषणा करण्याची वेळही पंतप्रधानांनी ठरवली होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!
Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं
Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद
Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग
Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग
Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी
Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती