ED

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

461 0

मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. काल मंगळवारी ईडीने सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या घरावर छापा टाकला होता. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. सचिन सावंत या अगोदर ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. दरम्यान सीबीआयने सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Buldhana News : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

सचिन सावंत सध्या सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सीबीआयने अधिकाऱ्याविरुद्ध नोंदवलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे हा छापा टाकण्यात आला आहे. सचिन सावंत हे ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांची एका बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणासंबंधित चौकशी सुरु होती.

या छाप्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सावंत (Sachin Sawant) यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेतली आहे. सचिन सावंत यांनी यापूर्वी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते. काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. या घोटाळ्याप्रकरणी सचिन सावंत यांची चौकशी सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!