SATISH BHOSALE BEED BJP: सतीश भोसले याने कबुली देत सांगितलं मारहाणीचं कारण

SATISH BHOSALE BEED BJP: सतीश भोसले याने कबुली देत सांगितलं मारहाणीचं कारण

1019 0

बीडमध्ये आधीच एक आमदार कार्यकर्त्यामुळे अडचणीत आले असताना आता आणखी एका आमदाराच्या कार्यकर्त्याचा पराक्रम समोर आला. सतीश भोसले (satish bhosale) नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याचा एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र ही मारहाण नेमकी का झाली याच कारण आता समोर आलंय.

सतीश भोसले हा भटके विमुक्त सेल्स पदाधिकारी आहे. तू आमदार सुरेश धस यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता आहे. त्यानेच एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण केले होती. त्यामध्ये हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याचे सगळे दातही पडले होते. यात मारहाणीचा व्हिडिओ काल समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओत दोन ते तीन जण मारहाण करायला मदत करतानाही दिसत आहेत. मात्र इतकं सगळं होऊनही सतीश भोसले वर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळेच सर्वच स्तरातून भोसलेसह सुरेश धसांवरही टीका होत होती. तर आताच समोर आलेल्या माहितीनुसार सतीश भोसले वर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ही मारहाण नेमकी का झाली याचं कारण स्वतः सतीश भोसले यानेच सांगितलं आहे. संबंधित व्यक्तीने आर्थिक फसवणूक केली होती, आणि एका महिलेची छेड ही काढली होती त्यामुळे राग अनावर झाल्याने आपण मारहाण केल्याची कबुली त्याने दिली आहे. सतीश भोसले यांनी स्वतःच कबुली जबाब देऊन मारहाणी मागचं कारणही सांगितल्याने या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. तर दुसरीकडे सतीश भोसले आपल्या मागे असं काही करतो हे आपल्याला माहीत नव्हतं असं सुरेश धस म्हणालेत. मात्र ज्याला लाडाने सुरेश धस खोक्या असं म्हणतात, त्या खोक्याचे हे पराक्रम धसांना खरंच माहीत नव्हते का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आता या प्रकरणात सतीश भोसलेवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!