संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनमानसात मोठा आक्रोश निर्माण झालाय. एक प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुले (SUDARSHAN GHULE) ला आपला गुन्हेगारीचा हॅशटॅग ट्रिपल थ्री ब्रँड गुन्हेगारी जगतात सेट करायचा होता अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख 9 डिसेंबरला अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येने राज्यासह देशभरातील वातावरण ढवळून निघालं. हत्येतील दोषींवर कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी जनसामान्यांमधून करण्यात येत होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. नुकतच या सर्व आरोपींवर न्यायालयात चौदाशे पानांपेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड असल्याचे आरोपपत्रात सांगण्यात आले. ज्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत संतोष देशमुखांचे अपहरण झालं ती गाडी सुदर्शन घुले याच्या नावावर होते. गाडीत सीआयडीला तब्बल 19 पुरावे मिळाले. आणि त्या गाडीचा नंबर होता MH 44 Z 9333. आणि याच गाडीच्या नंबर वरून सुदर्शन घुलेला गुन्हेगारी जगतात स्वतःचा #ट्रिपल थ्री सेट करायचा होता. याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये सुदर्शन घुलेने अनेक काळे कारनामे केल्याचेही समोर आले. या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तब्बल 19 पुरावे मिळाले ज्यामध्ये आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडले त्यामध्ये संतोष देशमुख हत्यासंदर्भात व्हिडिओ आढळून आला. त्याच बरोबर काळ्या काचाचे दोन गॉगल्स, सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेट,सहा आरसी बुक सुदर्शन घुलचे,एटीएम कार्ड, pan कार्ड,लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार,
रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर या संबंधातील महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणा स्कॉर्पिओ गाडी सापडले. याच गाडीचा मालक असलेला नराधम सुदर्शन घुले याला गुन्हेगारीचा बाप व्हायचं होतं आणि यासाठीच तो स्वतःचा हॅशटॅग ट्रिपल थ्री हा गुन्हेगारीचा ब्रँड तयार करण्यासाठी अनेक रील्सही समाज माध्यमांवर टाकायचा. हाच गुन्हेगारींचा बाप होऊ पाहणाऱ्या सुदर्शन घुलेला आता पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाला आहे आता जनमानसाणुत यांना धमाल फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.