सातारा : साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना (Satara News) घडली आहे. यामध्ये मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो व त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली आणि इतर मजकूर टाकून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना करपेवाडी (ता.पाटण) या ठिकाणी (Satara News) काल रात्री घडली. स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय 22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मोबाइलवरील स्टेट्स पाहताच काही जणांनी तातडीने स्वप्नीलच्या घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
स्वप्नील करपे हा खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करत होता. तर चे वडील व मोठा भाऊ कामानिमित्ताने मुंबईला असतात. दोनच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले असून, काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी माहेरी मुंबई गेली आहे. त्यामुळे घरी आई व स्वप्नील असे दोघेच होते. स्वप्नीलने खोलीत झोपायला गेल्यावर मोबाईलवर स्वतःचा फोटो तसेच त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली व इतर मजकूर लिहिलेला स्टेटस ठेवला आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला.
काय लिहिला मजकूर ?
“लवकरच या फोटोला हार चढणार आहे, शब्द आहे आपला. खूप केलं माणसांसाठी आता बस्स, नाय जमणार पुढे आयुष्य काढायला आणि नाय या फोटोला हार चढला तर मला….. बंटी करपे आपणास भावपूर्ण श्रद्धांजली” असा मजकूर त्याच्या स्टेटसला ठेवला. हे स्टेट्स पाहून काही जणांनी त्याच्या घराकडे धाव (Satara News) घेतली. खोलीचा दरवाजा बंद असल्याने व आतून हाकेला प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांनी खिडकीतून खात्री केल्यावर त्याने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे समोर आले. त्याच्या मागे पत्नी, आई – वडील, भाऊ असा परिवार आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.