शेतातून घराकडे जात असतानाच मृत्यने गाठलं आहे. सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पडून या अपघात झालाय.
ट्रॉलीमधील पाच महिलांपैकी 4 महिलांचा पाण्यात ट्रॉली खाली अडकून जागीच मृत्यू झाला. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना ही घटना घडली.
या घटनेची अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सातार्याजवळ असलेल्या कारंडवाडीतील सहा महिला शेतातील काम आटोपून ट्रॅक्टर ट्रॉलीमधून घरी परतत होत्या. दरम्यान, त्यांची ट्रॅटर ट्रॉली कॅनॉलजवळ आली असताना अपघात होऊन ही ट्रॉली कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेत ट्रॉलीमधील चार महिला ठार झाल्या, तर दोन महिलांचा वाचविण्यात यश आले आहे. लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (वय ५५), अरूणा शंकर साळुंखे (वय ६०), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६०, सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी बुडून मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत.