Satara News

Satara News : कराड तालुक्यातील वाघेरी येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

997 0

सातारा : कराड तालुक्यातील (Satara News) वाघेरी येथे एका संशयिताकडे भारतीय बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती सातारा (Satara News) स्थानिक गुन्हे शाखेला समजल्यानंतर त्याची संजय विष्णू बनसोडे याची अंगझडी घेण्यात आली. यावेळी त्याचे जवळ 1 लाख 15 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि 3 रिकामी काडतुसे आढळून आले आहे.

बेकायदेशीर पिस्टल बाळगल्याप्रकरणी युवकावर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत सातारा पोलिसांनी 38 देशी बनावटीचे पिस्टल आणि 53 काडतुसे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!