Satara Crime

धावत्या कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात साताऱ्यातील युवा उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू

21335 0

सातारा : पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावर (Pune – Bangalore Asian Highway) शनिवारी आटके टप्पा या ठिकाणी एका स्विफ्ट कारचा टायर फुटून एक भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात तरुण उद्योजक ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये कार अक्षरश: चक्काचूर झाली आहे. या अपघातामुळे काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

काय घडले नेमके?
शरद चंद्रकांत पाटील (वय 32, रा. पोतले ) (Sharad Chandrakant Patil) असे या अपघात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव होते. तो पेशाने एक तरुण उद्योजक होता. तर जखमीचे नाव समजू शकलेलं नाही. मृत शरद पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावरून सायंकाळी पाचच्या सुमारास हे कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे त्यांचा कारवरील ताबा आणि त्यांची कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकून पलटी झाली.

या अपघातात शरद पाटील यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात हलवले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!