सांगली : सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्यात दम लागल्याने ते पाण्यात बुडाले असावेत असा प्राथमिक पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर सांगली पोलिसांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
मंगळवारी भोसे येथे सांगली होमगार्ड चालकांची परीक्षा होती. या परीक्षेसाठी तिम्बती आवळे आणि त्यांच्या सहकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. होमगार्ड चालकांची परीक्षा झाल्यानंतर तिम्बती आवळे हे सहकारी विनायक कांबळे यांच्या घरी जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते. यानंतर पार्टी झाल्यानंतर दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र पोहत असताना तिम्बती आवळे यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्यात दम लागल्याने ते बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.