Breaking News
Samriddhi Highway Accident

Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू

638 0

छत्रपती संभाजीनगर : आज सकाळच्या सुमारास एक मोठी अपघाताची (Samriddhi Highway Accident) बातमी समोर आली आहे. यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. वैजापूर जवळील समृध्दी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर हा भीषण अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला ट्रव्हलर बस धडकल्याने हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
रात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रक जात होता. त्याला आरटीओने तपासणी साठी थांबवले. ट्रक रस्त्याच्या बाजूला असताना मागून येणारी बस ट्रॅव्हलर ट्रकवर धडकल्याने हा अपघात झाला. ट्रॅव्हलरच्या समोरच्या भागाचा अपघातात चक्काचूर झाला.. त्यात समोर बसलेल्या लोकांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका ५ वर्षीय चिमुकलीचा देखील मृत्यू झाला आहे. ट्रक अचानक थांबला आणि मागून येणाऱ्या बसला स्पीड नियंत्रित झाला नाही आणि हा अपघात झाला.

या बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी होते. हे सगळे लोक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. मृत्यू झालेल्यामध्ये चार महिन्याच्या बालकाचा देखील समावेश आहे. जखमी वर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमका अपघात कसा झाला, याची चौकशी सुरु आहे.

या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!