Accident News

Accident News : ट्रॅक्टर ट्रॉली नदीत उलटून भीषण दुर्घटना; 8 भाविकांचा मृत्यू

3993 0

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये बुधवारी रात्री उशिरा एक भीषण दुर्घटना (Accident News) घडली. यामध्ये (Accident News) भाविकांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीत कोसळला. या भीषण अपघातात 2 मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जण बेपत्ता आहेत. या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहरानपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

काय घडले नेमके?
सहारनपूरच्या (Accident News) बोंदकी गावात एका धार्मिक कार्यक्रमाहून परत येत असताना ही दुर्घटना घडली. 45 हून जास्त जण प्रवास करत असलेला ट्रॅक्टर ढमोला नदीच्या वेगवान प्रवाहात अडकला. तरीही ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली नदीच्या वेगवान प्रवाहातून बाहेर काढला पण त्यानंतर नियंत्रण सुटून ट्रॉली उलटली. यामुळे ट्रॉलीतील काही जण वाहून गेले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच डीएम, एसएसपी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य वेगाने सुरू असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य केले गेले. अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. तसेच या दुर्घटनेत 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!