पुणे : कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी (Pune Crime News) परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने चंदननगर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.
काय आहे नेमके?
लक्ष्मी केशव सीताफळे (वय 40, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे (वय 45) याला अटक करून त्याच्यावर चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. याच रागातून केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिचा गळा चिरून खून केला. यानंतर तो स्वतः चंदननगर पोलिस ठाण्यात हजर झाला. खूनामागचे निश्चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून पतीने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.