Double Murder Case

Double Murder Case : दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला ! आधी बायकोची केली हत्या आणि नंतर चिमुकल्याचा जीव घेतला

15095 0

रत्नागिरी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे. सध्या रत्नागिरीमध्ये दुहेरी हत्याकांड (Double Murder Case) घडले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला (Double Murder Case) आहे. यामध्ये आरोपी पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि मग सहा वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे. या हत्याकांडा प्रकरणी संदेश रघुनाथ चांदिवडे (संशयित) रा. कोट पाष्टेवाडी, ता. लांजा या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
संदेश याने पत्नी सोनाली (26) हिची हत्या कोयत्याचे वार करून केली, तर प्रणव (6) या स्वतःच्या मुलाची हत्या गळा दाबून केली आहे. या घटनेचे माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन पथकांची नेमणूक केली होती. संदेशने अज्ञात कारणावरून आपली पत्नी सोनालीची आणि मुलगा प्रणव यांची निर्घृण हत्या केली. चिमुकल्या प्रणवची हत्या गळा आवळून किंवा नाक तोंड दाबून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी संदेशविरुद्ध पोलीस पाटलांनी फिर्याद दिली आहे.

या दुहेरी हत्याकांड प्रकरणी (Double Murder Case) संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. संशयित फरार आरोपी संदेश चांदिवडे हा वीजबिलांच्या मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करत असे. या प्रकरणी पोलिसांनी घरामागील एका सड्यावर लपून बसलेल्या संदेशला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!