राज्यात दररोज महिला अत्याचारांच्या घटना समोर येत असताना पुण्यातही अशा घटनांचे प्रमाण वाढलं आहे. ओळखीच्या असलेल्या महिलेला जीवे मारण्याचे धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे घटना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
या प्रकरणी पोलिसांनी 32 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संतोष मारुती जायभाय (वय ३२, रा. कोलते पाटील टॉवर, मारुंजी, हिंजवडी)
असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी यांची पूर्वीपासून ओळख आहे. आरोपीने या महिलेला जिवे मारण्याची धमकी देत शरीर संबंध ठेवायला सांगितले. जर तिने मागणी मान्य केली नाही तर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याची धमकीही दिली. या महिलेला धमकी देऊन आरोपीने राहत्या घरी बोलावून घेतले व तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून त्या आधारे पोलिसांनी संतोष जायभाय याला अटक केली आहेत.