कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

1045 0

पुणे- पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश मारणे याच्या याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एका तरुणीने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही या तरुणीने केला आहे.

प्रथमेश मारणे याने जवळपास २ वर्ष विविध ठिकाणी नेऊन माझ्या मनाविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच हे सर्व करताना चोरून अश्लील व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ डिलीट करण्याबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली. पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर त्याने या तरुणीला धमक्या दिल्या. ‘काय करायचे ते कर, मी कुणाला घाबरत नाही’ असे म्हणत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि. कलम 376, 504, 506 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे कलम 66 (E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रथमेश मारणे याने आपली आई जयश्री मारणे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  अधिकृत प्रवेश केला होता.

 

Share This News
error: Content is protected !!