Pune News

Pune News : पतीच्या ‘त्या’ त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

505 0

पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पतीकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. पुण्याच्या येरवड्यातील नागपूरचाळ या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

काय घडले नेमके?
मोनिका मधुकर ओव्हाळ (वय 38) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे तर मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय 40) असे आरोपी पतीचे नाव आहे. हे दोघेही पुण्यातील येरवड्यातील नागपूरचाळ या ठिकाणी वास्तव्याला होते. दरम्यान पती मधुकर ओव्हाळ यांच्याकडून त्रास दिला जात असल्याने मोनिका यांनी मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती मधुकर याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. यानंतर आरोपी पतीला न्यायालयात हजर केले असता 10 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येरवडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Dharashiv Video : मद्यधुंद पोलिसाने मतदान केंद्रावर घातला गोंधळ; Video व्हायरल

Pune Crime : मैत्रिणींचे तसले व्हिडिओ काढून आपल्या मित्राला पाठवायची; पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide