Pune Accident

Pune Accident : नवले पुलाजवळ विचित्र अपघात; भरधाव ट्रकची दुचाकी-कारला जोरदार धडक

2728 0

पुणे : अपघाताचा हॉटस्पॉट बनलेल्या नवले पुलावर (Pune Accident) अजून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक- दुचाकी-कार यामध्ये हा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. कात्रज चौकाकडून येणाऱ्या ट्रकने नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

समोर असणाऱ्या इतर 5 वाहनांनाही जोराची धडक बसून विचित्र अपघात झाला, यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.संदेश बानदा खेडेकर असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रकचालक पंकज राजाराम नटकरे यास सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!