पुणे : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी छोट्या छोट्या कारणातून तरुण मुले आत्महत्येचा विचार करत आहेत. अशीच एक आत्महत्येची घटना पुण्यातील डेक्कन परिसरात घडली आहे. यामध्ये मराठवाडा मित्र मंडळ लॉ-कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने रँगिंगला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याला आत्महत्या (Suicide) करण्यास प्रवृत्त करणार्यांविरोधात चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये (Chathushringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
राज रावसाहेब गर्जे (Raj Raosaheb Garje) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या आत्महत्येप्रकरणी मृत राजचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे (Raosaheb Prahlad Garje) यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली आहे. निरूपम जयवंत जोशी (Nirupam Jaywant Joshi) याच्याविरूध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
राज आणि निरूपम हे दोघे एकमेकांना ओळखत होते. निरूपम हा कोणत्यातरी कारणावरून राजला मानसिक त्रास देत होता. अखेर रोज रोज होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून राजने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.