पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी स्वतःच्या जीवावर उदार होत दहशवाद्यांना पकडले होते. हे दहशतवादी पुण्यात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. या दहशतवाद्यांना पकडत असताना पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ 18 जुलै रोजी सकाळी 4 वाजताचा आहे.
पुण्यात दहशतवादी-पोलीस यांच्यातील झटापटीचा थरारक VIDEO आला समोर pic.twitter.com/9ChVPoSpJ5
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) August 4, 2023
काय आहे व्हिडिओमध्ये?
सीसीटीव्ही मध्ये चार वाजून 19 मिनिटांनी पळत अकबर एक बिल्डिंगमध्ये लपण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ठीक एका मिनिटानंतर सर्वकाही सामान्य परिस्थिती झाल्यासारखं समजून युनिस बाहेर येतो पोलीस कॉन्स्टेबल बाला रफिक शेख युनिट कडे पळत त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो परंतु युनिस कॉन्स्टेबलला चकवा देत पळत असल्याच दिसतंय. याच वेळी कॉन्स्टेबल चा फोन नाल्यामध्ये पडतो पण हवलदार युनिटचा पाठलाग करतात आणि दोन मिनिटानंतर त्याला पकडून वापस घेऊन येतात युनिस पुन्हा पुन्हा पळण्याचा प्रयत्न करतो मात्र तो त्यामध्ये यशस्वी होत नाही शेवटी कॉन्स्टेबल युनिसला मोटरसायकलवर बसवून पोलीस स्टेशनला घेऊन जातात.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या टीममधल्या कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण, अमोल नजन, बाला रफिक शेख आणि मंगेश शेळके यांनी केली आहे.