Pune Mall

Pune Fire : पुण्यात फिनिक्स मॉलला लागली भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

502 0

पुणे : पुण्यातून आगीची (Pune Fire) आणखी एक घटना समोर आली आहे. पुणे शहराच्या मधोमध असणाऱ्या फिनिक्स मॉलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 6 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र या आगीमुळे मॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज दुपारी 3.30 वाजता फिनिक्स मॉल, नगर रस्ता येथे आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून 5 फायरगाड्या 2 वॉटर टँकर व एक ब्रॉन्टो रवाना करण्यात आल्या होत्या. मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ही आग लागली होती. सदर रेस्टॉरंट हे कोविड नंतर पुर्णपणे बंद होते. तसेच मॉलमधील अग्निशमन यंञणा अद्ययावत व चालू स्थितीत होती. जवानांनी तातडीने आगीवर नियंञण मिळवले असून धोका टाळण्यात आला आहे. सद्यस्थितीत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत आग पुर्ण विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : इस्लामपूर येथील ‘घट्टे ट्रस्ट’ला ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेमधून माघार

Pune Loksabha : पुण्यात ‘या’ दिवशी होणार मोदींची जाहीर सभा

Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!