Pune Crime News

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

537 0

पुणे : पुण्यात (Pune Crime News) मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील कात्रज येथून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणातून आरोपी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीची छातीत बुक्क्या मारून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील कात्रज भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिची हत्या केली आहे. हा सगळा प्रकार घडला तेव्हा आरोपी पतीने मद्यपान केले होते. क्षुल्लक कारणावरुन राग अनावर झाल्याने माथेफिरूने पत्नीची हत्या केली आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे. माधुरी कांबळे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे तर तानाजी कांबळे असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी माधुरीचा मुलगा पियुष कांबळे याने तानाजी कांबळे विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी तानाजी कांबळेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही घटना 22 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास दत्तनगर चौकात घडली आहे. तानाजी हा मजुरी करतो, तसेच त्याला दारू पिण्याचेही व्यसन आहे. पुण्यातील कात्रज येथे तो त्याची पत्नी, मुलगा, सासू-सासरे असा परिवार राहतो. रात्री दहाच्या सुमारास नेहमी प्रमाणे तानाजी कांबळे हा दारू पिऊन घरी आला. घरी बायकोने जेवण तयार न केल्याने कांबळे हा खूप चिडला आणि त्याने बायकोला बेदम मारहाण केली. यानंतर माधुरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन

Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!