pune crime

Pune Crime : सिंहगड रोड परिसरात घरफोडी करणारे सराईत अटकेत; आरोपींकडून 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

429 0

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवरील मधुरा बंगला सफलानंद सोसायटी इथे घरफोडी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या गुन्ह्याचा तपास सिंहगड रोड पोलीस करत होते. आणि आता या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून आरोपींकडून तब्बल 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?
सिंहगड रोड पोलिसांना त्यांच्या सूत्रांमार्फत घरफोडी करणारे आरोपी हे तुकाईनगर सर्कल जवळ थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्याचवेळी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. दरम्यान या गुन्ह्यात संकेत निवंगुणे व सुरज भरडे या आरोपींना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून 19 लाख वीस हजारांचे दागिने व तीस हजार रुपये किमतीची टू व्हीलर जप्त करण्यात आली आहे. चोरीचे दागिने विक्रीसाठी मदत करणारा आरोपींचा साथीदार लक्ष्मण जाधव देखील पोलिसांच्या अटकेत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

 

Share This News
error: Content is protected !!