Arrest

Pune Crime : 8 महिन्यापासून फरार असलेला आरोपी ओंकार मोरे अखेर जेरबंद

592 0

पुणे : 8 महिन्यापासून फरार असलेला आणि चोरीचे (Pune Crime) तब्बल 11 गुन्हे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केलं आहे.त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे 11 गुन्हे (Pune Crime) दाखल आहेत.ओंकार राजेश मोरे ( वय 19, रा. स. न.14, रामनगर, येरवडा, पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुप्त बातमीदाराकडून शाखा युनिट सहाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यानां माहिती मिळाली की ,वाहन चोरी करणारा व वाहनातून बॅटरी चोरी करणारा ओंकार मोरे हा चोखीधानी रोड याठिकाणी थांबलेला आहे. त्यावेळी शाखा युनिट सहाचे अधिकारी आणि अंमलदार रमेश मेमाणे व ऋषीकेश ताकवणे यांच्यासह युनिट सहा च्या टीमने त्याला ताब्यात घेतले.

Nanded Crime News : नांदेड हादरलं ! एका मोबाईलवरून मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

आरोपी ओंकार मोरे याने (Pune Crime) त्याचा साथिदार शुभम जांभूळकर याच्या मदतीने वाहन चोरीचे चार गुन्हे आणि वाहनातील बॅटरी चोरीचे सात गुन्हे असे एकूण 11 गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, प्रमोद मोहिते, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार यांनी ही कामगिरी बजावली आहे.

Share This News
error: Content is protected !!