Nanded Crime News

Nanded Crime News : नांदेड हादरलं ! एका मोबाईलवरून मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

1199 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded Crime News) भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मोबाईलच्या देवाण घेवाणीवरुन दोन भावांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि, मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा गळा (Nanded Crime News) आवळून खून केला. ही घटना नांदेड शहरालगत असलेल्या गोपाळचावडी या ठिकाणी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठ्या भावाने मोबाईलसाठी लहान भावाचा खून केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अर्जुन राजू गवळे (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Pune Crime News : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर

काय घडले नेमके?
नांदेड शहरापासून काही अंतरावर गोपाळचावडी हे छोटे गाव आहे. गावातील रहिवासी अर्जुन राजू गवळे आणि त्याचा मोठा भाऊ करण राजू गवळे या दोन्ही भावंडामध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोबाईलमुळे मोठा वाद झाला. लहान भाऊ अर्जुनने करणकडे मोबाईल वापरण्याकरिता मागितला. मात्र, करणने मोबाईल देण्यास नकार दिला. या वरून दोघा भावांमध्ये जोरदार भांडण झालं. कालांतराने या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. लहान भावाने आपल्याला मारहाण केल्याचा संताप आल्याने करणने 20 वर्षीय अर्जुनचा साडीने गळा आवळून खून केला.

या प्रकरणी (Nanded Crime News) मृत अर्जुनचा मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे यांच्या तक्रारीवरुन सोमवारी ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात तसेच त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरिक्षक विजय पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!