Pune Accident

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात ! उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाने 5 जणांना उडवले

4374 0

पुणे : पुण्याच्या (Pune Accident) हिंगणे चौकात एक भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. यामध्ये तीन महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलगा यांचा समावेश आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पाचही जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
जखमी झालेल्या महिला रिक्षाची वाट बघत रस्त्यावर उभ्या होता. त्यावेळी भरधाव क्रेटा गाडी आनंद नगरहून हिंगणे चौकात आली. त्यानंतर गाडी यु टर्न घेऊन पुन्हा आनंद नगरच्या दिशेने निघाली होती. या गाडीमध्ये एक दांपत्य त्यांच्या दोन-तीन महिन्याच्या बाळासह होते. आनंद नगरच्या चौकात असलेल्या बालरोग तज्ज्ञ मानकर रुग्णालयात त्यांना जायचे होते. बस थांब्याच्या अलीकडे एक दुचाकी उलट्या दिशेने येत होती. त्यावर दोन महिला बसल्या होत्या. उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला चुकवण्यासाठी चालकाने गाडी वळवली. मात्र, यादरम्यान एक महिला मध्ये आल्याने गाडी चालकाचे नियंत्रण सुटले.

यानंतर या गाडीने बस स्थानकाजवळ उभ्या असलेल्या तीन महिलांना उडवले. यादरम्यान एक दुचाकी गाडीत अडकल्याने गाडी तेथेच थांबली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांसह एक लहान मुलगा आणि एक पुरुष जखमी झाला आहे. ही संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!