Prithviraj Chavan

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

1022 0

सातारा : माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना ईमेल करून धमकी देण्यात आल्याने त्यांच्या कराडमधील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई करण्याच्या विधानसभेतील मागणीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाता कडुन धमकीचा ईमेल आला आहे. कराड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता महात्मा गांधी यांच्यावरील विधानाचे प्रकरण चांगलेच तापले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडें- गुरूजी यांचा एक व्हिडिओ समोर आला असून ते महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशानात संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची व अटकेची मागणी केली होती. त्यानंतर राज्यभर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!