DRDO

Pradeep Kurulkar : हनीट्रॅप प्रकरणात DRDO कडून घडली ‘ही’ मोठी चूक

530 0

पुणे : पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने कोठडी सुनावली होती. दहशतवाद विरोधी पथकाकडून 3 मे रोजी कुरुळकर (Pradeep Kurulkar) यांना अटक करण्यात आली.

चौकशी दरम्यान डीआरडीओ कडून मोठी चूक झाल्याचं पुढे आला आहे. एटीएसने तपासासाठी डीआरडीओकडून प्रदीप कुरुलकरांचा लॅपटॉप तपासणी साठी मागितला होता. पण डीआरडीओकडून चुकीच्या व्यक्तीचा लॅपटॉप तपासणीसाठी दिला होता.एटीएसने ही चूक डीआरडीओच्या लक्षात आणून दिली.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

पाकिस्तानी हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याचा कुरुलकरांवर आरोप आहे. या आरोपावरून त्यांना एटीएसने ताब्यात घेतले होते. 25 जून रोजी त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांची न्यायालयात सोमवारी सुनावणी होती. कुरुलकर हे तपासात अपेक्षित सहकार्य करत नसल्याने त्यांची व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी आणि पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी एटीएस कडून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. न्यायालयाने या दोन्ही चाचणी मधील फरक स्पष्ट करण्यात सांगितले आहे. आता पुढील सुनावणी 30 जूनला होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!