Accident

Accident : हिंगोलीत भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

663 0

हिंगोली : हिंगोली (Hingoli) नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटा येथे भीषण अपघातात (Accident) पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निळकंठ दंडगे असे या अपघातात (Accident) मृत्यू पावलेल्या पोलीस उपनिरीक्षकचे नाव आहे.

आईच्या मृत्यूची बातमी समजताच मुलानेदेखील रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

या अपघातात पोलीस निरिक्षकासह दंडगे यांच्यासह त्यांचे दोन सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत पावलेले पोलीस उपनिरीक्षक निळकंठ दंडगे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.

आईचा मृतदेह घेऊन लेक सहा तास फिरला; पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर

जखमींना बाहेर काढत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत पावलेले पोलीस उपनिरीक्षक निळकंठ दंडगे हे हिंगोली जिल्ह्यातील जामगव्हाण येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे (Accident) परिसरात व पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!