Stones Pelted

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

804 0

वाशिम : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर सात ते आठ जणांच्या टोळक्यानं प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स बस लुटण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडली. यावेळी टोळक्यांकडून बसवर दगडफेक (Stones Pelted) करण्यात आली. अचानक दगडफेक (Stones Pelted) झाल्यामुळे बस चालकाने बसचा वेग वाढवून ती पुढे काही अंतरावर नेऊन थांबवली.

पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग

रोडच्या मध्येच ट्रॅव्हल बस थांबल्यानं मागून येणारी वाहने देखील थांबली. यानंतर हे दरोडेखोर (Robber) अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या दगडफेकीत ट्रॅव्हल्स च्या कॅबिनमध्ये चालकाच्या विरुद्ध बाजूस बसलेल्या दयाराम राठोड यांना दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या दगडफेकीच्या घटनेत ट्रॅव्हल्समधील इतरही काही प्रवासी जखमी झाले आहेत.

अरे बापरे! चक्क सुरक्षा रक्षकाने रुग्णाला दिले इंजेक्शन; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

प्रवाशांमध्ये दहशत
या घटनेने प्रवाशांमध्ये दहशत पसरली असून, प्रवाशांमध्ये भीतीचं (Stones Pelted) वातावरण तयार झाले आहेत. समृद्धी महामार्गावर दोनद ते शेलू बाजारदरम्यान पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!