मुंबई : मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला (Vishal Pawar Death Case) आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. नुकतीच आता विशाल पवार यांच्या शवविच्छेदन अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळू शकते. शवविच्छेदन अहवालात विशाल पवार यांच्यावर विषप्रयोग झाला नसल्याचे उघड झाले आहे.
1 मे रोजी कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी विशाला पवारचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता. या जबाबात मोबाईल चोरांचा पाठलाग करत असताना सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दुल्ल्यांनी हल्ला केल्याचा विशाल पवारांनी दावा केला होता. तसंच चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांनी आपल्याला विषारी इंजेक्शन दिल्याचा देखील दावा विशाल पवार यांनी मृत्यूपूर्वी केला होता. पण तपासामध्ये ही सगळी कहाणी बनाव असल्याचे उघड झालं होतं. त्यानंतर आता शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांच्यावर विषप्रयोग झाला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय आता खरा ठरला आहे. अशामध्ये दारुचे अतिसेवन केल्यामुळे विशाल पवार यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस या केसचा तपास बंद करण्याच्या तयारीत आहेत.
विशाल पवार यांचा 1 मे रोजी ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी कोपरी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना एका टोळक्याने त्यांच्या हातावर कोयत्याने वार केले आणि मोबाइल घेऊन पळ काढला. त्यांनी त्यांला विषारी इंजेक्शन टोचल्याने ते बेशुद्ध झाले.रात्री 1 वाजेपर्यंत ते ट्रॅकजवळ पडून होते. यानंतर ते उठले आणि माटुंगा रेल्वे स्थानक गाठलं. येथून सकाळची ट्रेन पकडून साडेअकरा वाजता ठाण्यातील कोपरी येथील त्यांच्या घरी पोहचले. त्यानंतर रात्री त्यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांच्या चुलत भावाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं,असं कोपरी पोलिसांना सांगण्यात आलं. बुधवारी उपचारादरम्यान विशाल पवार यांचा मृत्यू झाला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना
Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!