पिंपरी-चिंचवड : पिंपरी -चिंचवडमधून (Pimpari – Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शहरात (Pimpari – Chinchwad) असलेल्या मरकळगावमधील सुदर्शन वस्तीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं पुरुष जातीचं अर्भक आढळून आलं आहे. हे अर्भक दोन ते तीन असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बाळाला भर पावसात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रस्त्यावर सोडण्यात आले होते. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Ahmadnagar News : धक्कादायक! अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक
अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल
ही घटना स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सध्या या बाळावर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मरकळ गावचे पोलीस पाटील विठ्ठल टाकळकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
IND vs WI 2nd Test : विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस ‘तो’ विक्रम
या तक्रारीनंतर पोलिसांनी (Pimpari – Chinchwad) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भर पावसात निर्दयी मातेनं आपलं दोन ते तीन दिवसांचं बाळ रस्त्यावर सोडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.