छत्रपती संभाजीनगर : आपण जेव्हा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी (Viral Video) जातो तेव्हा पेट्रोल पंपावर या ठिकाणी मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे अशा आशयाची पाटी आपण पहिली असेल. मात्र तरीदेखील काही लोक याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर करताना दिसतात. याच मोबाईलच्या वापरामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर pic.twitter.com/MUrw14WOXD
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) June 11, 2024
काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील एका पेट्रोल पंपावर ही धक्कादायक घटना घडली आहे. बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरणं सुरू होतं. त्याच वेळी अचानक फोन वाजला, पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागली. आग पाहून मोठा गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत दुकजाकीस्वारांनी आणि पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज
Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली