Navi Mumbai Video

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

515 0

नवी मुंबई : नवी मुंबईतून (Navi Mumbai Video) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यानं मालकाचा नंबर दिला नाही म्हणून दुकानात आलेल्या एका व्यक्तीनं थेट हातात तलवार घेऊन राडा केला आहे. नवी मुंबईतील सिवुड्स परिसरात असलेल्या एका दुकानात ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
ही घटना नवी मुंबईतील सिवुड्स परिसरात घडली आहे. सिवड्स परिसरात असलेल्या एका दुकानात एक व्यक्ती घुसला, त्याने कर्मचाऱ्याकडे मालकाच्या नंबरची विचारणा केली, मात्र कर्मचाऱ्याने मालकाचा नंबर देण्यास नकार दिला. नंबर मिळाला नाही म्हणून तो व्यक्ती दुकानातून बाहेर पडला. मात्र त्यानंतर काही वेळातच हा व्यक्ती हातात तलवार घेऊन दुकानात शिरला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक व्यक्ती हातात तलवार घेऊन दुकानात घुसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो पुन्हा आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याने दुकानापुढे विक्रीसाठी ठेवलेले नारळ देखील खाली फेकल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mulshi Accident : मुळशीतील पिरंगुट घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा भीषण अपघात

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल ‘महाराष्ट्र केसरी’

Cataracts : डोळ्यात मोतीबिंदू होऊ नये म्हणून आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करा समावेश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!