Navi Mumbai News

Navi Mumbai News : बसची धडक बसल्याने संतप्त कारचालकाने रागाच्या भरात थेट तलवार काढली अन्…

5261 0

नवी मुंबई : शहरात अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात अपघात झाला (Navi Mumbai News) तर अनेक वेळा जखमी व्यक्तींना मदत करायचे सोडून अनेक जण पळ काढतात तर काहीजण एकमेकांवर हात उचलतात. हातात जे असेल ते फेकून मारतात. अशीच एक घटना वाशी परिसरामध्ये घडली. ह्या घटनेमध्ये बस आणि कारची धडक झाली. ह्या धडकेनंतर कारचालकाने रौद्र रूप धारण केले.

प्रवाशांची बस जोरदार कारला धडकल्यामुळे कार चालकाने थेट तलवार काढली. या घटनेचे भयानक रूप प्रवाशांना प्रवास करताना पाहायला मिळाले. या घटनेमध्ये नवी मुंबई महानगर पालिकेच्या बसची कारला जोरदार धडक बसली. ह्या धडकेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडक होताच कारमधील चालक बाहेर येऊन बस चालकाला जोरजोरात शिवीगाळ करू लागला. त्यात तो शिव्या देऊनच थांबला नाही तर त्याने हातात तलवार घेऊन थेट बसवर सपासप वार करत राहिला. त्याने थेट चालकाला मारण्याची धमकी देखील दिली आहे.

ही सर्व घटना रात्रीच्या वेळी 10 ते 11 च्या दरम्यान घडली आहे. ह्या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ह्या घटनेसंदर्भातील आरोपीबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी लांबा असे तलवार हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीचे नाव आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीकडे तलवार कुठून आली, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातग्रस्त बस ही उरणवरून कोपर खैरणेला जाणारी होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाशी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Vijay Karanjkar

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट ! ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करत विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

Posted by - May 3, 2024 0
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha) एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचा…

‘आम्ही खूप प्रयत्न केले पण …’ पंकजा मुंडेंची उमेदवारी डावलल्यानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Posted by - June 8, 2022 0
मुंबई – सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे, शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. याकरिता सर्व पक्ष तयारीला…
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Posted by - June 3, 2024 0
वाशिम : समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Accident) हा अपघाताचे हॉटस्पॉट बनले आहे. आज सकाळी पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात…
Satara Death

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला; पत्नीचा जागीच मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *