NIA

दहशतवादी संघटनांशी कनेक्शन ? कोल्हापुरातील हुपरीत ‘NIA’चा छापा ; दोघे ताब्यात…(VIDEO)

458 0

कोल्हापूर (हुपरी) : दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून एनआयएच्या म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात रविवारी मध्यरात्री छापा टाकला. याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून कोल्हापूर परिसरातील गोपनीय ठिकाणी त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

अधिक वाचा : CRIME NEWS VIDEO : सांगली जिल्हा मध्यवर्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून खून प्रकरणातील आरोपी पसार 

या सर्व घडामोडीत स्थानिक पोलीस यंत्रणा मात्र अनभिज्ञ आहे. ‘एनआयए’च्या छापेमारीमुळं कोल्हापूर जिल्ह्यातसह पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडालीये.

राष्ट्रीय तपास संस्थेनं ताब्यात घेतलेले दोघेही नात्यानं जवळचे असल्याचं समजतं मात्र त्यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यातील एका तीस वर्षीय संशयित तरुणानं संस्थेची स्थापना करून त्यामार्फत तो शिक्षण प्रसाराचं काम करत होता, अशी ही माहिती सूत्रांकडून समजते. राष्ट्रीय तपास संस्थेनं राज्यात 13 ठिकाणी काही संशयित तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर आणि नांदेड येथील छापेमारीचा समावेश असल्याचं समजतं.

अधिक वाचा : शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक

 

Share This News
error: Content is protected !!