Chandrakantada Patil : सिंहगड रस्ता सन सिटी ते कर्वेनगर पूल बांधणीच्या कामास गती द्या !

247 0

पुणे : कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानच्या राजाराम पूलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार असून, या कामास गती देण्याची सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आयुक्त डॉ विक्रम कुमार यांना दिल्या.

पुणे महापालिकेच्या प्रस्तावित कर्वेनगर ते सनसिटी पूल या प्रकल्पाची भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकातदादा पाटील यांनी कर्वेनगर स्मशानभूमी येथे पाहाणी करून, आढावा घेतला. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, माजी नगरसेविका वृषाली चौधरी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : दहशतवादी संघटनांशी कनेक्शन ? कोल्हापुरातील हुपरीत ‘NIA’चा छापा ; दोघे ताब्यात…(VIDEO)

कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाज पत्रकातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

त्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकातदादा पाटील यांनी सदर प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहाणी करून, आढावा घेतला. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित पुलामुळे सिंहगड रोड आणि कोथरूड आणि कर्वेनगर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने, प्रस्तावित पुलाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवून, सदर प्रकल्पास गती देण्याची सूचना आ. पाटील यांनी आयुक्तांना केली.

अधिक वाचा : CRIME NEWS VIDEO : सांगली जिल्हा मध्यवर्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून खून प्रकरणातील आरोपी पसार

Share This News

Related Post

‘हसीन दिलरुबा’ : शमा सिकंदराने सोशल मीडियावर लावली आग; बोल्ड फोटोमध्ये फ्लोन्ट केली टोन्ड फिगर, पहा फोटो

Posted by - January 28, 2023 0
मुंबई : टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदरने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती ब्लॅक कलरची मोनोकिनी…

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने 11 लाखाचे सोने केले जप्त; महिलेने सोन्याची अफरातफर करण्यासाठी लढवली अशी शक्कल

Posted by - December 22, 2022 0
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिस्टम विभागाने ११ लाखाचे सोने केले जप्त केले आहे. सुमारे ११ लाखाच्या सोन्याची अफरातफर करणाऱ्या…

पुणे : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर कामे करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - August 27, 2022 0
पुणे : शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करावे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच उपलब्ध मनुष्यबळात आवश्यकतेनुसार वाढ करावी ,…
Ajit Pawar

Ajit Pawar : पुण्याचा पालकमंत्री बदलणार? अजित पवारांचे सूचक विधान

Posted by - August 28, 2023 0
पुणे : आज पुण्यामध्ये (Pune News) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन…

ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन

Posted by - November 26, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बालगंधर्व मंदीर येथे अंत्यदर्शन घेवून त्यांच्या पार्थिवावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *