Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का ! हायकोर्टानं जामीन फेटाळला

829 0

मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा (Nawab Malik) जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं गुरुवारी फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय कारणामुळे मला जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांनी या अर्जातून केली होती.

Accident News : समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; 20 जण जखमी

न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निकाला दिला आहे. तसेच दोन आठवड्यांनंतर त्यांच्या जामीनाच्या याचिकेवर योग्यतेनुसार सुनावणी घेण्यात येणार आहे. आपलं एक मुत्रपिंड निकाली झालं असून दुसरं केवळं 60 टक्के काम करत आहे. माझी तब्येत आणखी बिघडत आहे, त्यामुळं आपल्याला योग्य पद्धतीनं उपचार करता यावेत यासाठी जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मलिक यांनी आपल्या याचिकेतून केली होती.

Light : कुणी लाईट देता का लाईट? वर्ध्याच्या पठ्ठ्याचा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन…

ईडीनं मलिकांच्या याचिकेला विरोध करताना असे अनेक लोक आहेत जे एकाच किडनीवर जगू शकतात. मलिकांच्या (Nawab Malik) मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांच्या दुसऱ्या किडनीची केवळ 60 टक्केच प्रक्रिया सुरु असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही. त्यामुळं मलिकांच्या केसमध्ये जामीन मंजूर करू नये अशी मागणी केली होती.

Share This News
error: Content is protected !!