छत्रपती संभाजीनगर : जेव्हापासून समृद्धी महामार्ग लोकांसाठी खुला करण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत अपघाताचे (Accident News) सत्र सुरूच आहे. ते काही कमी होताना दिसत नाही आहे. काही दिवसांपूर्वीच महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (Accident News) होऊन त्यामध्ये 25 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना आता समृद्धी महामार्गावर आणखी एका ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे.
Andhra Pradesh Accident : बस कॅनॉलमध्ये पडून भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू
काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला.या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. त्यातील 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 9 जणांवर अजूनही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Malad Crime News : मालाडमध्ये रिक्षात महिलेचा विनयभंग; 12 तासात आरोपीला अटक
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रात्रीच्या सुमारास खुराणा ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर गेट नंबर 16 वर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.