Breaking News
Nashik News

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

502 0

नाशिक : नाशिकच्या (Nashik News) सिन्नर तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये चिमुकल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. धनश्री रविंद्र भंडकर (4) व आविष रवींद्र भंडकर (5) अशी मृत पावलेल्या बहिण भावाची नावं आहेत. ही मुलं खेळताना घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पाच ते सहा फूट खोल तलावात पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

काय घडले नेमके?
या गावामध्ये एकाच समाजाची बहुसंख्य कुटुंब आहेत, यातील एक कुटुंबाच्या घरी लग्न असल्यामुळे गावातील जवळपास सर्वच जण लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. गावात थोडेफार ग्रामस्थ होते. या मुलांची आई देखील घऱीच होती.ही मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आले नाही. दरम्यान जेव्हा लग्नावरून वऱ्हाड परतलं, तेव्हा त्यांना त्या तलावाजवळ लहान मुलांची आरडाओरड ऐकू आली. काय झालं म्हणून पाहाण्यााठी काही जण गेले असताना समोरचं दृष्य पाहून धक्काच बसला. या दोन्ही बहीण भावांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले.

ग्रामस्थांच्या मदतीनं या मुलांना तातडीनं तलावाबाहेर काढण्यात आले, त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता.डॉक्टरांनी या मुलांना तपासून मृत घोषीत केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Share This News
error: Content is protected !!