नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत टेम्पो ट्रॅव्हलर संपूर्ण जळून खाक झाली. यावेळी वाहनातील प्रवासी भाविक प्रसंगावधान राखून वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
काय घडले नेमके?
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर आज रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन हे नांदुरी ते सप्तशृंगी गड या रस्त्याने गडावर जात असताना वाहनाच्या इंजिनमधून अचानक धूर आला. वाहनातून धूर निघत असल्याने चालकांनी तत्काळ वाहन थांबवले. यावेळी प्रवाशीही सतर्कता बाळगून वाहनातून पटापट बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
यांनतर काही क्षणात गाडीने पेट घेतला. यावेळी मार्गावरुन गडावरून येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिकांनी याबाबतची माहिती ट्रस्ट व ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थ, ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व रोप वे ट्रॉलीचे कर्मचारी यांनी अग्निशामक यंत्रासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथक व रोप वे ट्रॉली येथील कर्मचारी यांनीही अग्निशामक यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला. वाहनात 2 चालक, 10 महिला, 9 पुरुष असे एकूण 21 प्रवासी होते. हे सर्व भाविक शिर्डी येथून साई दर्शन घेवून भाडोत्री टेम्पो ट्रॅव्हलरने वणी गडावर देवी दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Solapur News : धक्कादायक ! सोलापुरात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड
Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक