Sudhakar Badgujar

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

316 0

नाशिक : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या प्रकरणावरुन अडचणीत सापडलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सलीम कुत्ताच्या व्हिडीओ प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी देखील बडगुजर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून महानगरपालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोण आहे सलीम कुत्ता?
सलीम कुत्ता हा 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आहे. तो पॅरोलवर बाहेर असताना त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर हे देखील सहभागी झाले होते. त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तसेच ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Elections 2024 : वंचितने मविआच्या बैठकीत केल्या ‘या’ 4 मागण्या

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

Manoj Jarange Patil : ‘आता माफी नाही’, भाजपच्या ‘या’ नेत्याने मनोज जरांगेंना दिला इशारा

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीचा मृत्यू

ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!